ग्रामपंचायत नसरापूर येथे नागरिकांना पारदर्शक, उत्तरदायी व जबाबदार प्रशासन प्रदान करण्याच्या उद्देशाने
माहितीचा अधिकार (RTI) अंतर्गत सर्व आवश्यक माहिती तसेच विकास कामांची सविस्तर माहिती
वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत ग्रामपंचायत नसरापूर मार्फत नागरिकांना विविध दाखले व प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक अर्ज, कागदपत्रांची माहिती व नमुने येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.